मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग; माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम सुरू
मुंबई दि.१६ :- मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्गाअंतर्गत माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या ४.४१ किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. हे काम पुढील वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर शपर्यंत पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला आहे का? – उद्धव बाळासाहेब ठाकरे
हा बोगदा सुरू झाल्यानंतर अंबरनाथमधील भोज गाव आणि पनवेलमधील मोरबेदरम्यानचे अंतर एक ते दीड तासांऐवजी केवळ तीन-चार मिनिटात तर मुंबई ते बडोदा प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण करता येणार आहे.
मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम बडोदा ते तलासरी आणि तलासरी ते मोरबे, पनवेल अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे. ४.४१ किमी लांबीच्या आणि ५.५ मीटर उंच, तसेच २१.४५ मीटर रुंदीच्या या बोगद्याच्या भुयारीकरणाला फेब्रुवारीत सुरुवात करण्यात आली.