दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू – राज ठाकरे
मुंबई दि.१६ :- जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे महाराष्ट्रात होते, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय, माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात मानत नाही, त्या माणसाला महत्त्व देतो, असेही ठाकरे म्हणाले. असे कोणतेच आरक्षण कधीही मिळणार नसल्याचे आपण
मनोज जरांगे- पाटील यांना भेटून सांगितले होते.
टिळकनगर शाळेत सलग दुसऱ्या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा
मुळात त्यांच्या मागे कोण आहे? त्यांना कोण बोलायला सांगताय? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये भाजपने मतदारांना मोफत अयोध्यावारी घडविण्याचे अश्वासन दिले. त्यावरुनही ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजविण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण न्यायालय ठरविणार का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.