सामाजिक

प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘बिंब बचकेएवढे’ पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेची बांधणी करणारे आणि अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एका विशेष अभिवाचन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सृजन संपदा’, ‘अभाविप’ आणि ‘विद्यार्थी निधी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रा. यशवंतराव केळकर यांनी लिहिलेल्या दैनंदिनीचे संपादित पुस्तक “बिंब बचकेएवढे” याचे संपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण करमरकर आणि प्रा. जयंत कुलकर्णी यांनी केले आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ प्रचारक श्री. रवीकुमार अय्यर आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार श्री. विनोद तावडे ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभेल.

हा कार्यक्रम दिनांक: रविवार, १७ मे २०२६. रात्री ८.०० वाजता (मानपाडा, ठाणे (पश्चिम) इथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, इथे आयोजित करण्यात आलेल्या आहे.

हा कार्यक्रम सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास निमंत्रक नयना सहस्त्रबुद्धे (सृजन संपदा) आणि प्रा. मिलिंद मराठे (अभाविप, विद्यार्थी निधी) यांनी व्यक्त केला आहे.