केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला आहे का? – उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुंबई दि.१६ :- केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला का? असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला. मध्यप्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
टिळकनगर शाळेत सलग दुसऱ्या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा
एकीकडे भाजपला फ्री हीट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. १९९५ मध्ये राज्यात आमचे सरकार असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. कर्नाटकमध्ये भाजपने ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करा असे सांगितले होते. आता मध्य प्रदेशात मोफत अयोध्या वारी घडविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त राजभवनातील कर्मचारी, कामगारांना मिठाई वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगानं आचारसंहिता बदलली काय? असा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारला असल्याचे ठाकरे म्हणाले. प्रियांका गांधी, राहुल गांधी, केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला नोटीसा पाठविल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता निवडणूक प्रचार पूर्ण व्हायच्या आत याचे उत्तर द्यावे, असेही ठाकरे यांनी सांगितले. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव म्हणून तुम्ही आता मतदान करा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.