मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना ‘मनसे’चा घेराव – सिनेट निवडणुकीसाठी नव्याने
मतदार नोंदणीचा निर्णय मागे घेण्याची मागणी
मुंबई दि.०६ :- मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून मनसेने आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना घेराव घातला. यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना विदुषकाचा मुखवटा घालण्याचा प्रयत्न केला. सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने दिला.
अमृतोत्सवातील शरयू दातेच्या व्हॅायेजने डोंबिवलीकरांनी साजरा केला रंगभूमी दिन ……….
विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळांनी आक्रमक होत आज कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली.
आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील संचलनासाठीची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
यावेळी मतदार नोंदणीसह मुंबई विद्यापीठाच्या काही निर्णयावर मनविसेने नाराजी व्यक्त केली. यावेळी शिष्टमंडळाने कुलगुरुंविरोधात घोषणाबाजी केली. सिनेट निवडणुकीत नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून तुमचे पुतळे जाळू, असा मनविसेने कुलगुरूंना थेट इशारा दिला.