Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील संचलनासाठीची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल

मुंबई दि.०४ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाड्यांमधील शेवटची (नववी) मेट्रो गाडी शुक्रवारी मुंबईत दाखल झाली.

वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर आकारण्यात येणारा भरमसाठ वस्तू आणि सेवा कर कमी करावा

आता लवकरच पहिल्या टप्प्यादरम्यान चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे कामे सुरू आहे.

कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये सोमवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा

या मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात या मार्गिकेवरील विविध चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *