वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी सूचना – मुखपट्टी वापरण्याचे आवाहन
मुंबई दि.०६ :- गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत ‘मविआ’ १,३१२ जागी विजयासह राज्यात आघाडीवर: नाना पटोले
राज्यातील १७ प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवा कमी प्रदूषित
सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर चालणे टाळा, घराचे दरवाजे, खिडक्या उघडू नका, लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळू नका, दिवाळीत फटाके फोडणे टाळावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी मध्यम ते वाईट श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवेची गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे.