ग्रामपंचायत निवडणुकीत ‘मविआ’ १,३१२ जागी विजयासह राज्यात आघाडीवर: नाना पटोले
मुंबई दि.०६ :- राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजय तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १,३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
अमृतोत्सवातील शरयू दातेच्या व्हॅायेजने डोंबिवलीकरांनी साजरा केला रंगभूमी दिन ……….
दादर येथील टिळक भवन येथे ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिम्मत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आव्हानही पटोले यांनी दिले. राज्यात दुष्काळ असून केवळ ४० तालुक्यातच सरकारने दुष्काळ जाहीर केला. दिवाळी तोंडावर आली आहे पण शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही, अवकाळीची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, असेही पटोले म्हणाले.