मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवा कमी प्रदूषित
ठाणे दि.०४ :- ठाणे शहरातील नौपाडा, कोपरी आणि वर्तकनगर भागात महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागातर्फे करण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता तपासणीत शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० ते १३८ इतका आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवा कमी प्रदूषित असल्याचे समोर आले आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विशेष सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उदघाटन
२३ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. नौपाडा येथील महापालिका शाळा क्रमांक १९ आणि २०, वर्तकनगर येथील रेप्टाकॉस कंपनी परिसर, कोपरी येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९ याठिकाणी महापालिकेच्या पथकांनी हवा मोजणी यंत्राद्वारे हवेची गुणवत्ता तपासली.
आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील संचलनासाठीची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
नौपाडा येथील महापालिका शाळा क्रमांक १९ आणि २० या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० इतका तर वर्तकनगर येथील रेप्टाकॉस कंपनी परिसर येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२४ इतका नोंदला गेला.
कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये सोमवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा
कोपरी येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९ परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३८ असल्याचे दिसून आले. इतर दोन ठिकाणांच्या तुलनेत कोपरी परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक जास्त आहे. मात्र या तिन्ही ठिकाणची हवा मध्यम प्रदुषित गटात नोंदविली गेली आहे.