मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विशेष सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उदघाटन
मुंबई दि.०४ :- मीरा भाईंदर वसई विरार शहरात घडत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर तपास करण्यासाठी विशेष सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उदघाटन शनिवारी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील संचलनासाठीची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
१६ जानेवारी २०१६ साली सायबर विभागाला पोलीस ठाण्याचा दर्जा देत असल्याचा आदेश गृह विभागाकडून देण्यात आला आहे. याच आदेशाचा आधार घेत पोलीस आयुक्तालयाने २ जानेवारी २०२३ रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास शासनाने नुकतीस मंजुरी दिली होती.