राज्यात आणखी चार ठिकाणी ‘पुस्तकांचे गाव’
मुंबई दि.०३ :- राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पुस्तकांचे गाव’ योजनेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) या चार ठिकाणी ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्यात येणार आहे.
तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे – रामदास आठवले
या चार गावांमध्ये वाचकांना पुस्तक उपलब्ध करून द्यावीत, गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून दहा दालने तयार करण्यात यावीत, या दालन्यांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावी तसेच त्यातील एका धरणात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशाने उपलब्ध असावेत असे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस राजभवन येथे साजरा
या सर्व दालनात प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याची सूचना केसरकर यांनी राज्य मराठी विकास संस्थेला केली. मुंबईत झालेल्या मराठी भाषा विभागाच्या बैठकीत केसरकर यांनी ही माहिती दिली. त्या बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, राज्य विकास मराठी संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.