तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे – रामदास आठवले
मुंबई दि.०१ :- तामिळनाडू राज्यात ६९ टक्के आरक्षण आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस राजभवन येथे साजरा
तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण आहे. तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का असे मिळून ६९ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनाही बोलवायला हवे होते – बाळा नांदगावकर
त्याप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.