व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन
मुंबई दि.०३ :- व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. मसाले, लोणचे, पापड आणि इतर विविध उत्पादने बनविणारा बेडेकर समूह दिवंगत व्हीपी बेडेकर यांनी सुरू केला. १९१० मध्ये गिरगावमध्ये किराणा दुकान म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला पुढे तो वाढविला.
राज्यात आणखी चार ठिकाणी ‘पुस्तकांचे गाव’
गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ लोणची, पापड आणि मसाले या क्षेत्रात बेडेकर कार्यरत आहेत. लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच काळानुरुप बदल करून बेडेकर यांनी बेडेकर उत्पादनांनि वेगळे स्थान निर्माण करून दिले.
तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे – रामदास आठवले
दरम्यान बेडेकर यांच्या निधनाने मराठी उद्योग क्षेत्रातील एक महत्वपूर्ण तारा निखळला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेडेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बेडेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.