कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहीम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
मुंबई दि.०३ :- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी राबविण्यात आलेली मोहीम आता संपूर्ण राज्यभरात राबविण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा
मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे यावेळी उपस्थित होते.
माजी मंत्री, ‘उबाठा’ गटाचे आमदार वायकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात ‘ईडी’ कडून गुन्हा दाखल
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.