विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा
मुंबई दि.०३ :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांचा स्नेहमेळावा येत्या ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
माजी मंत्री, ‘उबाठा’ गटाचे आमदार वायकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात ‘ईडी’ कडून गुन्हा दाखल
या वेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व आणि आमच्या आठवणीतील विधानपरिषद (असे सदस्य…असे प्रसंग) या विषयांवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानपरषिदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मध्य रेल्वेवर उद्या रात्रीच्या वेळेत तर हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी मेगाब्लॉक
शतकमहोत्सवानिमित्त विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्य, गत शंभर वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून यासंदर्भातील संपादन कार्यवाहीस सुरुवात झाली आहे.