* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> माजी मंत्री, ‘उबाठा’ गटाचे आमदार वायकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात ‘ईडी’ कडून गुन्हा दाखल – मुंबई आसपास मराठी
राजकीय

माजी मंत्री, ‘उबाठा’ गटाचे आमदार वायकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात ‘ईडी’ कडून गुन्हा दाखल

मुंबई दि.०३ :- राज्याचे माजी मंत्री, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर, हॉटेल बांधताना तथ्य लपविल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता.

मध्य रेल्वेवर उद्या रात्रीच्या वेळेत तर हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी मेगाब्लॉक

त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही समन्स बजाविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडी तपास करत आहे.

व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *