ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ
ठाणे दि.२९ :- ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या १ लाख २९ हजार ३७२ ने वाढली आहे. जिल्ह्यात आता मतदारांची एकूण संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ झाली असून १३३ मतदान केंद्रही नव्याने तयार करण्यात आली आहेत.
कल्याण पूर्व, पश्चिम टिटवाळा, शहाड येथील पाणीपुरवठा मंगळवारी बंद
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात ५ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव यादीतून वगळणे किंवा त्यांचे छायाचित्र जोडून घेणे, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे यादीतून वगळणे यांसारखी कामे करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल, १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १८-१९ वयोगटातील नव मतदारांची नोंदणी, लक्षित घटकांची आणि महिला मतदारांची नोंदणी विशेष करून भिवंडी व ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये व इतर सर्व मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.