सुनील तटकरे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे
ठाणे दि.२९ :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांना मराठा समाजाच्या नेत्यांनी ठाणे येथे आज काळे झेंडे दाखविले. तटकरे यांची पत्रकार परिषद ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
कल्याण पूर्व, पश्चिम टिटवाळा, शहाड येथील पाणीपुरवठा मंगळवारी बंद
पत्रकार परिषदेसाठी तटकरे राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत असताना अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले आणि त्यांनी तटकरे यांना काळे झेंडे दाखविले, घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.