राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२७ :- केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘पपंतप्रधान मातृवंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
‘माझी माती माझा देश’ अभियान म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्या वीरांच्या बलिदानाला नमन
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पंतप्रधान मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात आम्हालाही कार्यालय मिळावे- अंबादास दानवे
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण
अंगणवाडी सेविकांना भ्रमणध्वनी खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल, अशी माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री इराणी यांनी दिली.
पंतप्रधान मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि भ्रमणध्वनी ॲपचे यावेळी उदघाटन करण्यात आले.