‘माझी माती माझा देश’ अभियान म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्या वीरांच्या बलिदानाला नमन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई दि.२७ :- ‘माझी माती माझा देश अभियान’ देशासाठी हुतात्मा होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करणारा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे.
कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील समितीला २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ
ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ऑगस्ट क्रांती मैदान हे ऐतिहासिक मैदान असून ‘भारत छोडो’ चा नारा येथून देशभर गेला. ९ ऑगस्ट रोजी माझी माती माझा देश उपक्रमाची सुरुवात याच मैदानातून आपण केली. माझी माती माझा देश हा राष्ट्रभक्ती, देशभक्ती वाढीस लावणारा कार्यक्रम आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनीही मनोगत व्यक्त केले.