ठळक बातम्या

बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी मुंबई दि.२७ :- ज्येष्ठ कीर्तनकार दिवंगत ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबामहाराज यांचे नातू ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांनी अंत्यसंस्कार केले.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने सातारकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली.

बांधकाम मजुरांसाठीची माध्यान्ह भोजन योजना येत्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे आदेश

बाबामहाराज यांच्या मोठ्या भगिनी माई महाराज, मुलगी ह.भ.प. भगवती ताई महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सातारकर यांचे चाहते, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *