खेळ

विशेष ऑलिम्पिकमधील सहभागी महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई दि.२५ :- बौद्धिक दृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या ‘विशेष ऑलिम्पिक’मध्ये भारताला भरघोस पदके मिळवून देण्या-या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षकांना गौरविण्यात आले.

ठाणे खाडीवरील पादचारी पुलामुळे प्रवासी, नागरिकांना दिलासा

बौद्धिक अपंग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदके प्राप्त करणे, हा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रभाग संचालक डॉ भगवान तलवारे , तसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील सुवर्ण, रजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते.

भिवंडी निजामपूर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लहान अग्निरोधक वाहनांचा समावेश

विशेष ऑलिम्पिक मध्ये भारतातून १९४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी २०२ पदके जिंकली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत २० पदके जिंकली, अशी माहिती विशेष ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *