‘बेस्ट’ च्या जुन्या बसमध्ये आता उपहारगृह, कलादालन, वाचनालय
मुंबई दि.२० :- ‘बेस्ट’ च्या जुन्या बसमध्ये आता उपहारगृहा, कलादालन, वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. बेस्टची मालकी असलेल्या या जुन्या बस भंगारात न काढता त्याची डागडुजी करून उपरोक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जुनी निवृत्ती योजना, अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी समन्वय समितीची उद्या बैठक
बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात स्वतःच्या मालकीच्या १ हजार २८४ आणि भाडेतत्त्वावरील १ हजार ६९४ अशा २ हजार ९७८ बस आहेत. बेस्ट उपक्रमाच्या स्वतःच्या मालकीच्य काही बसचे आयुर्मान लवकरच संपुष्टात येणार आहे. आयुर्मान संपलेल्या बस भंगारात न काढता त्याचा उपयोग अशा प्रकारे केला जाणार असल्याचे केसरकर म्हणाले.