जुनी निवृत्ती योजना, अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी समन्वय समितीची उद्या बैठक
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता
मुंबई दि.२० :- जुनी निवृत्ती योजना आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची उद्या (शनिवार) बैठक होणार आहे. या बैठकीत संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यातील कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पमागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता मात्र गेल्या सहा महिन्यात एकूण 18 मागण्यांपैकी एकाही मागणीवर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही सरकारकडून होत असलेल्या या निरंकारी बद्दल तसेच आरोग्य शिक्षण आणि पोलीस विभागातील कंत्राटी भरती शिक्षण क्षेत्रातील संभाव्य खाजगीकरण आदी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.