मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली – दीपक केसरकर
मुंबई दि.२० :- मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली. बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर बोलत होते.
मालाड येथील प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्यात १७० प्राण्यांवर अंत्यसंस्कार
मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून कोळीवाडे आणि गावठाण्यात वास्तव्यास असलेले नागरिक मूळ रहिवासी आहेत. कोळीवाडे म्हणजे जुन्या मुंबईची ओळख आहे. या कोळीवाड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
जेजे कला आणि उपयोजित महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
कोळीवाड्यांची, तेथील घरांची विशिष्ट रचना असते, त्यांची खास संस्कृती आहे. कोळीवाड्यांचे एक खास सौंदर्य आहे. हे सौंदर्य, ओळख टिकवून ठेवून हा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्याची गरज असल्याचे केसरकर म्हणाले. कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्य बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.