मालाड येथील प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्यात १७० प्राण्यांवर अंत्यसंस्कार
मुंबई दि.२० :- बृहन्मुंबई महापालिकेने मालाड येथे सुरू केलेल्या प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्याभरात मृत झालेल्या पाळीव प्राण्यांसह
भटके कुत्रे, कासव, पक्षी, ससा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही एकूण संख्या १७० इतकी आहे. मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित दहन व्यवस्था करण्यात आहे.
जेजे कला आणि उपयोजित महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
नैसर्गिक वायूवर (पीएनजी) आधारित प्राण्यांच्या दहनाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक असून ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.