कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२० :- कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली – दीपक केसरकर
समाजाच्या विविध मागण्या तसेच जातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र विषयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
मालाड येथील प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्यात १७० प्राण्यांवर अंत्यसंस्कार
या समाजाच्या जातीचे दाखले व वैधता विषयक उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा विधी व न्याय विभागाकडून मत मागवण्यात यावे. तसेच आदिवासी विभागाच्या कार्यालयातील अधिकारी जळगाव येथेही उपस्थित राहून कामकाज पाहतील अशी व्यवस्था करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.