दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि.१७ :- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील ब्रेल लिपीतील क्रमिक पुस्तकाचे काल राजभवनात प्रकाशन करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात ‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’ राबविणार
दहावीच्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना विज्ञान भाग १ व २ या विषयांची प्रॅक्टिकल्स करताना अडचणी होत असल्यामुळे उपरोक्त दोन विषयांची पुस्तके तयार करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या संस्थेच्या पुढाकाराने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व मिल्टन कंपनीच्या सहकार्याने शाळांमध्ये मोफत वितरणासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करणार
रोटरी क्लबने केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार करून न थांबता पुढील वर्गांसाठी लागणारी ब्रेल लिपीतील क्रमिक पुस्तकेही तयार करावीत, अशी सूचना राज्यपाल बैस यांनी केली. माजी खासदार संजीव नाईक, रोटरी जिल्हा ३१४२ चे गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे अध्यक्ष सुकुमारन नायर यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित दृष्टिबाधित विद्यार्थ्याने ब्रेल लिपीतील पुस्तकातील परिच्छेद वाचून दाखविला.