राज ठाकरे, दादा भुसे यांच्या बैठकीत विविध १६ निर्णय
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ते छोट्या वाहनांचा टोल माफी
मुंबई दि.१३ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात पथकरासंदर्भात (टोल) झालेल्या बैठकीत तब्बल १६ निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पथकर आणि इतर अनुषंगिक विविध मुद्द्यांवर सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुंबईतील टोलनाक्यावरील एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ते छोट्या वाहनांचा टोल माफ करण्यापर्यंतच्या निर्णयाचा यात समावेश आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात
पथकर नाक्यांवर राज्य शासनासह मनसेकडूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रोज किती वाहने येतात आणि किती जातात याची नोंद ठेवण्यात येणार आहे. टोलनाक्यांच्याजवळ महिला आणि पुरुष प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत. सरकार त्याची अंमलबजावणी करणार असून मनसेच्यावतीने मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटला महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी दहा स्वच्छता गृहे उभारण्यात येतील, असे ठाकरे यांनी सांगितले. प्रथोमपाचारसेवा, रुग्णवाहिका, क्रेन, पोलीस अंमलदार. तक्रार वही आदी गोष्टी असतील, प्रवाशांसाठी टोल नंबर दिला जाईल.
लोअर परळच्या उड्डाणपुलावर पदपथ बांधण्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आदेश
लोकांना त्या नंबरवर संदेश पाठवून तक्रार करता येईल. या यंत्रणेचे नियंत्रण मंत्रालयात असेल, आयआयटीच्या तज्ज्ञांकडून सर्व उड्डाण पूल आणि भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, प्रत्येक टोल नाक्यावर पूर्वी असलेली यलो लाईन पुन्हा सुरू करण्यात येणार असून यलो लाईनच्या पुढे २०० ते ३०० मीटरच्या पलिकडे असलेल्या वाहनांना टोल न घेताच सोडण्यात येईल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ असे ४४ जुने टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. त्यावर ते निर्णय घेतील आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.
