बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात
मुंबई दि.१२ – ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. ‘म्हाडा’ उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी तीनही बीडीडी चाळीला भेट दिली आणि पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा घेतला.
लोअर परळच्या उड्डाणपुलावर पदपथ बांधण्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आदेश
पहिल्या टप्प्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत यावेळी जयस्वाल यांनी दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले.
भिवंडी निजामपूर महापालिकेचा विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध; नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या
‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत तिन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारतींची कामे सुरू आहेत.