ऑलिपिंक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.११ :- आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद भुषविण्याची संधी मिळाली आहे. अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले. या कार्यकारी मंडळाचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे स्वागत केले.
अकरावी प्रवेशाची सातवी आणि अंतिम प्रवेश फेरी आजपासून सुरु
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती नीता अंबानी, मार्क ॲडम्स, ख्रिस्टेन क्लाई, मरीना बारामिया, मोनिका श्रेर, टिना शर्मा यांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने भारताचे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील स्थान आणखी बळकट होईल.आमच्यासाठी ही गौरवास्पद संधी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष बाख , नीता अंबानी यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मुदतवाढ
अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
अधिवेशनाचे औपचारिक उदघाटन येत्या १४ ऑक्टोबर रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर येथे होणार आहे. अधिवेशनाच्या आधी १२ ते १४ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.