* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मुदतवाढ – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मुदतवाढ

१६ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुदत

मुंबई दि.११ :- मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज करण्यास मुंबई विद्यापीठ प्रशासनाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यापीठाच्या https://mu.ac.in/carees या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

कंटेनर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

विद्यापीठाच्या आस्थापनेवरील कुलसचिव (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता आंतर विद्याशाखीय अभ्यास (अनुदानित – खुला प्रवर्ग), वित्त व लेखा अधिकारी (अनुदानित – खुला प्रवर्ग), संचालक आजीवन अध्ययन व विस्तार (अनुदानित – खुला प्रवर्ग) आणि संचालक माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेतील कर्मचारी- कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्याची मागणी

विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क, शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम व अटी याची सविस्तर माहिती http://www.mu.ac.in या संकेतस्थळावरील ‘Careers’ या लिंकवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *