ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाख्याने मुंबईकर हैराण
मुंबई दि.११ :- पुढील काही दिवस मुंबई शहर आणि उपनगरांत मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले जाईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाची सातवी आणि अंतिम प्रवेश फेरी आजपासून सुरु
मुंबईतून पावसाने माघार घेतल्यानंतर आता शहर आणि उपनगरांत ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई परिसरातही उन्हाच्या झळा जाणवत आहेत.