कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा मंत्रालयावर मोर्चा
मुंबई दि.११ :- कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) येत्या १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ऑलिपिंक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना नोकरीची सुरक्षितता द्यावी, समान काम समान वेतन द्यावे आणि अन्य मागण्यांबाबत हा मोर्चा काढण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. पुणे येथे झालेल्या या बैठकीस २८ जिल्ह्यांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाख्याने मुंबईकर हैराण
शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घ्यावे, प्रलंबित धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना २० हजार रुपये पगार वाढ मिळावी, सुरक्षा साधने, गणवेश, जादा कामाचा भत्ता मिळावा आदी मागण्यांही करण्यात आल्या आहेत.