मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेच्या जोडणी कामामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या रद्द
२५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
मुंबई दि.१० :- मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे मुख्य काम २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या आणि ६१ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.
नायर रुग्णालयाचे फिरते नेत्रतपासणी केंद्र आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून २९ दिवस रूळजोडणीचे काम चालू राहणार आहे. नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतर या मार्गाने लोकल चालविण्यात येणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सध्या दोन जलद आणि दोन धीम्या मार्गिका आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसहून ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पाचव्या मार्गिकेवरून धावतात. गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी देण्यात येणार आहे. या सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालविण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे.