* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता – हिंदु जनजागृती समिती – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता – हिंदु जनजागृती समिती

मुंबई दि.१० :- पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी इस्त्राइलवर केलेल्या आक्रमणाचा हिंदू जनजागृती समितीने तीव्र निषेध केला आहे.‌ जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्राइलच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीने घेतली आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

आज इस्राइलमध्ये आक्रमण झाले, यापूर्वी काश्मीरमध्येही अशी आतंकवादी आक्रमणे होत होती; उद्या अन्य कुठेही अशी आक्रमणे होऊ शकतात. जिहादी आतंकवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. त्याचा जागतिक स्तरावर विरोध व्हायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या समर्थनाची अर्थात् जिहादी दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेतली. भारत सरकारच्या या भूमिकेचेही हिंदु जनजागृती समिती समर्थन करते, असे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण; मोठी खासगी गुंतवणूक

इस्राइलवर आक्रमण झाल्यावर त्यांनी प्रतिकार न करता दुसरा गाल पुढे करत ‘गांधीगिरी’ करणे काँग्रेसला अपेक्षित आहे का ? काँग्रेसची ही भूमिका जिहादी दहशतवादाचे समर्थन करणारी आहे. त्यामुळे इस्राइलवरील हल्ल्याबद्दल जेवढा निषेध ‘हमास’चा करायला हवा, तेवढाच निषेध जिहादी दहशतवादाचे समर्थन करणार्‍या काँग्रेसचाही करायला हवा, असे समितीचे म्हणणे आहे.

डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटच्या वापरावर तातडीने निर्बंध आणा – विजय वडेट्टीवार

अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनीही इस्राइलच्या विरोधात मोर्चे काढले, ही बाब अतिशय गंभीर आहे. यातून अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचे विद्यार्थी हे ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे उघडउघड समर्थन करत आहेत. या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन्.आय्.ए.च्या) माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *