नवी मुंबईत दोन हजारांहून अधिक दुचाकी चालक विनाहेल्मेट; ११ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल
नवी मुंबई दि.११ :- नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत ३ हजार ९३८ वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हजार ३७१ दुचाकी चालक विनाहेल्मेट प्रवास करताना आढळून आले.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेच्या जोडणी कामामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या रद्द
या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून ११ लाख ४५ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत तर यापैकी १ हजार ७६ वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे करण्यात येत आहे.