ठळक बातम्या

नायर रुग्णालयाचे फिरते नेत्रतपासणी केंद्र आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नऊ महिन्यांत २०७२ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी
मुंबई दि.१० :- नायर रुग्णालयाच्या फिरत्या नेत्रतपासणी केंद्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्याला ‘अकॉईन मसिहा हेल्थ सर्व्हिस इन मुंबई’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना घराजवळ नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नायर रुग्णालयाने जानेवारीमध्ये फिरते नेत्रतपासणी केंद्र सुरू केले होते.

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये फिरत्या नेत्र तपासणी केंद्राच्या माध्यमातून २०७२ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२५ रुग्णांवर मोतीबिंदू , ११२ ग्लुकोमाच्या तर २८२ लहान मुलांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गोवंडी, ट्रॉम्बे आणि शिवाजी नगर या परिसरासह मुंबईतील झोपडपट्टी परिसरामध्ये रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *