कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टपाल विभागातर्फे मुंबई विभागात ई-वाहनांचा वापर केला जाणार
मुंबई, दि. ९
केंद्र सरकारच्या ई-वाहनांच्या धोरणानुसार टपाल विभागातर्फे आता मुंबई विभागातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक टपाल विभागाची वाहने धावतात. मुंबईत एकूण २४० चारचाकी गाड्या आहेत. ई-वाहनांसाठी चार्जिंग सोयीपासून इतर बाबींचा विचार करून त्यानुसार योजना आखली जात आहे, असे टपाल विभागातर्फे सांगण्यात आले.
मुंबईतही दुचाकी वाहनांमध्ये ई-वाहनांच्या समावेशाचा विचार सुरू आहे. ही वाहने भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी घेतली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पुणे विभागामध्ये ई-वाहनांचा वापर सुरू झाला. यामध्ये दुचाकी वापरण्यात आल्या होत्या.
—–