‘रामलीला’ आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी मैदानांचे भाडे निम्म्याने कमी करा- मंगलप्रभात लोढा
अग्निशमन दलाकडून आकारले जाणारे शुल्कही माफ
मुंबई, दि. ९
‘रामलीला’ आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी मैदानांचे भाडे निम्म्याने कमी करण्याबरोबरच अग्निशमन दलाकडून आकारले जाणारे शुल्कही माफ करण्याची सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला केली.
नवरात्रीचे नऊ दिवस रामलीला आयोजित करणाऱ्या मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत लोढा बोलत होते. बैठकीला महापालिका अधिकारी, पोलीस विभाग, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परवानगीसाठी एक खिडकी योजनाही सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
विविध सरकारी संस्थांकडून परवानगी न मिळाल्याने नाराज झालेल्या रामलीला आयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी महापालिका मुख्यालयात ही बैठक आयोजित केली होती
