नवरात्रोत्सवासाठी टेंभीनाका परिसरात १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
ठाणे, दि. ९
आगामी नवरात्रोत्सवासाठी टेंभीनाका परिसरात ठाणे वाहतूक पोलिसांकडून येत्या १५ ऑक्टोबरपासून वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. हे बदल २४ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानक येथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना टाॅवर नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गडकरी रंगायतन चौक, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गातून वाहतुक करतील.
गडकरी चौक येथून टाॅवरनाका येथे जाणाऱ्या सर्व वाहनांना गडकरी चौक परिसरात बंदी असेल. येथील वाहने दगडी शाळा मार्गे वाहतुक करतील. चरई येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंभीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना धोबी आळी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबी आळी चौक, डाॅ. सोनुमिया रोड, धोबी आळी मशीद येथून वाहतुक करतील. कोर्टनाका चौक येथून आनंदाश्रम मार्गे टाॅवरनाका मार्गे वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जांभळी नाका, टाॅवरनाका मार्गे वाहतुक करतील.
दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर मार्गे टेंभीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्गे, अहिल्यादेवी बाग, धोबी आळी चौक, धोबी आळी मशीद मार्गे वाहतुक करतील. धोबी आळी चौक येथून दांडेकर ज्वेलर्स मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबी आळी चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबी आळी चौक, चरई, एलबीएस रोड मार्गे वाहतुक करतील.
——–