शबरी सेवा समितीतर्फे येत्या ८ ऑक्टोबर रोजी ‘आम्ही शबरीच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली दि.०५ :- शबरी सेवा समितीतर्फे येत्या ८ ऑक्टोबर रोजी ‘आम्ही शबरीच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मुंबई सेंट्रल-बांदा आणि बोरिवली-बांदा या मार्गावर शयनयान बस सुरू
सातपुड्यातील दुर्गम धडगाव, अक्कलकुवा, अविकसित जव्हार या ठिकाणी काही महिला स्थानिक समस्यांना तोंड देऊन, मार्ग शोधून रचनात्मक आणि सकारात्मक काम करत आहेत. यापैकी काही महिलांचे स्वानुभव कथन व त्यांचा कौतुक सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी टप्पा पार
हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालय, पहिला मजला, डोंबिवली (पूर्व) येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शबरी सेवा समितीने केले आहे.