‘रुळानुबंध’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
डोंबिवली दि.०५ :- गणेश मनोहर कुलकर्णी लिखित ‘रुळानुबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ७ ऑक्टोबर या दिवशी डोंबिवलीत एका कार्यक्रमात होणार आहे. ज्येष्ठ लेखिका, अनुवादक उमा विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये, कवी, गझलकार चंद्रशेखर सानेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शबरी सेवा समितीतर्फे येत्या ८ ऑक्टोबर रोजी ‘आम्ही शबरीच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमात पुस्तकाविषयी रविप्रकाश कुलकर्णी, स्वानंद बेदरकर, श्रीराम हसबनीस आणि लेखक गणेश मनोहर कुलकर्णी मनोगत व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी सहा वाजता होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.