राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मुंबई सेंट्रल-बांदा आणि बोरिवली-बांदा या मार्गावर शयनयान बस सुरू
मुंबई दि.०५ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मुंबई सेंट्रल-बांदा आणि बोरिवली-बांदा या मार्गावर शयनयान बस सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये ३० शयनकक्ष असून मोबाइल चार्जिग, स्वतंत्र खिडकी, झोपण्यासाठी गादी, उशी आदी सुविधा आहेत.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी टप्पा पार
मुंबई सेंट्रल-बांदा बस पुणे-कोल्हापूरमार्गे धावणार आहे. या बसचे भाडे १,२४६ रुपये आहे. बोरिवली-बांदा बस महाड, चिपळूणमार्गे धावणार असून या बसचे भाडे ५८४ रुपये आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये ५० अत्याधुनिक, विनावातानुकूलित शयनयान बसची बांधणी सुरू आहे. यापैकी दोन बस मुंबई-बांदा मार्गावर धावणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी असलेल्या सवलती लागू आहेत.