उद्योग व्यापार

तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात तैवानबरोबर सहकार्य वाढविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.०५ :- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तैवान आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आणि तैवान मध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

शासकीय रुग्णालयात दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी

तैवान एक्स्टर्नल डेव्हलपमेंट कौन्सिल (ताईत्रा) चे अध्यक्ष जेम्स हुआंग, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तैपाई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर, मुंबईचे महासंचालक होमर च्यांग आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल असून राज्यात १७ हजार नोंदणीकृत स्टार्टअप, तर देशातील १०० पैकी २५ युनिकॉर्न आहेत. ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक

राज्यातील डाटा सेंटरची क्षमता सातत्याने वाढत आहे. परकीय थेट गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून २०२८ पर्यंत राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ताईत्राचे अध्यक्ष जेम्स हुआंग यांनी तैवान विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करीत असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ९० कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *