ठळक बातम्या

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा

मुंबई दि.०५ :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्य यांची आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात तैवानबरोबर सहकार्य वाढविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित करावयाच्या संदर्भसमृद्ध ग्रंथांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्य, गेल्या शंभर वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

शासकीय रुग्णालयात दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी

प्रस्तावित प्रकाशने आणि परिसंवाद यासंदर्भात ज्येष्ठ विद्यमान आणि माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय अभ्यासक यांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत विधानमंडळाकडे अवश्य कळवावे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *