शासकीय रुग्णालयात दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी
महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश समितीची मागणी
मुंबई दि.०५ :- राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन सरकार बरखास्त करावे, अशी मागणी निवेदनात केली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक
राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर नाही. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयातून याची सुरुवात झाल्याचे पटोले यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तत्काळ भेट द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची ची आर्थिक मदत करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.