घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी टप्पा पार
मुंबई दि.०५ :- घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी टप्पा पार केला असून २७ सप्टेंबर या दिवशी ४ लाख ७९ हजार ३३३ प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. करोना काळानंतर पाहिल्यांदाच मेट्रो १ ने विक्रमी प्रवासी संख्या गाठली आहे. मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी मेट्रो १ मार्गिका २०१४ पासून सेवेत दाखल आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती
करोना काळाआधी या मार्गिकेवरुन दिवसाला ४ लाख ४० हजार ते ४ लाख ६५ हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र करोना काळाचा मोठा फटका या मार्गिकेला बसला. मार्च ते ऑक्टोबर २०२० दरम्यान ही मार्गिका पूर्णतः बंद होती.
सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांकडून दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
करोना नियमानुसार ५० टक्के क्षमतेने मेट्रो १ धावत आल्याने आणि कमी फेऱ्या असल्याने या काळात काही हजार प्रवासी मेट्रो १ ने प्रवास करत होते. मात्र करोना निर्बंध हटविल्यानंतर मेट्रो १ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे.