सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक
मुंबई दि.०५ :- गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.
टोळीतील आठही आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीतील काही आरोपी टिळकनगर रेल्वे स्थानकाबाहेर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
‘खलिस्तान काल,आज आणि उद्या’ या विषयावर अनय जोगळेकर यांचे शनिवारी व्याख्यान
पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली. सफिक गायन (३७), अजिजूल लक्षर (३५), अलमगीर हुसेन (४७) आणि अबू तडफदार (३७) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चौकशीत अन्य काही साथिदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी जहांगीर मौला (३७), आशिष प्रधान (३८), मनरुळ शेख (२५) आणि जावेद अख्तर (२५) या चौघांना अटक केली.