दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि.०४ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ॲाक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरला नुसत्या डोळ्यांनीही पाहता येणार
८ ॲाक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता सुधीर महाबळ ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राने केले आहे. दादर पूर्व येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात व्याख्याने होणार आहेत.